हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्नी प्रलंबित असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात कृषी कायदा करणार असल्याची माहिती बुधवारी दिली. त्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अधिवेशनाच्या मुद्यावरून टीका केली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला आरक्षण व शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून सडेतोड प्रश्न विचारणार असल्याचे शेलार यांनी मुंबईत म्हटलं आहे.
राज्य सरकारने दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ठेवल्याने त्यात वाढ करावी अशी यापूर्वीच भाजपच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती. आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले कि, बरेचसे प्रश्न असताना सरकारने यापेक्षा अजून छोट अधिवेशन करता येणं शक्य नाही म्हणून कि काय दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे.
या दोन दिवसांमध्ये परिणामकार करीत्या शेतकऱ्यापासून आरक्षणापर्यंत तसेच कायदा सुव्यवस्थेपासून कोव्हिडच्या प्रशनापर्यंत सर्व विषयांना न्याय देण्याच्या संदर्भात हि रणनीती आम्ही ठरवलेय. आम्ही रणनीती आखली आहे. ती म्हणजे राज्य सरकारने घेतलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरणार आहे. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व शेतकऱ्याच्या मुद्यांवर आम्ही सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार आहोत, असेही यावेळी शेलार यांनी म्हंटले आहे.