मुंबई । राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीनं आत्महत्या केल्याची प्रकरण सुद्धा समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आली आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. १५ एप्रिलच्या मध्यरात्री या महिलेने रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. कोरोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला दम्याचा आजार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते. आत्महत्या करणारी महिला वरळीच्या जिजामाता नगरमधील होती. नायर रुग्णालयातील वॉर्ड क्र. २५ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यापासून तिला नैराश्य आलं होतं. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
याआधी नाशिकमध्ये एका तरूणानाने कोरोना झाल्याच्या नुसत्या संशयावरून आत्महत्या केली होती. तर, नगरमधील अकोले येथे एकानं रुग्णालयात स्वत:ला संपवलं होतं. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, असं प्रशासनाकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. तरीही अशा घटना घडत असल्यानं चिंता वाढली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…