अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती च्या धामणगार रेल्वे येथे नागपूर येथून आल्यानंतर ताप आल्याने प्रथम धामणगाव,अमरावती त्यानंतर सावंगी मेघे येथे दाखल केलेल्या एका एकविस वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील धवनेवाडी परिसरातील एक तरुणी मागील पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथून आली होती. ताप खोकला असल्याने ३ मे रोजी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आली होती.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी सदर युवतीला घशाचा अधिक त्रास वाढल्याने अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले प्रकृती अधिक गंभीर झाल्याने येथे सावंगी मेघे येथे दाखल करण्यात आले मागील दोन दिवसापूर्वी सदर युवतीचा थ्रोट स्वाब घेण्यात आला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभागाची तातडीने बैठक घेऊन हा परिसर सील करण्यात आला आहे. संबंधित नातेवाईकांचे थ्रोड स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
तसेच या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे या भागातील घरकाम करणाऱ्या महिला बुधवार बाजार येथील काही व्यक्ती तसेच पेंटिंग काम करणाऱ्याची संख्या अधिक आहे संबंधित कामगारांनी घरीच राहण्याचे आवाहन तहसीलदार भगवान कांबळे व दत्तापूर चे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी केले आहे. दरम्यान या ठिकाणी ३ दिवसीय जनता कर्फ्यु करण्यात आलाय. तर संपूर्ण परिसराची पाहणी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केली असून योग्य त्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.