हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध पाठविल्याबद्दल अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाविरूद्ध लढत आहे. जगातील अनेक देश अन्य देशांनाही यामध्ये मदत करीत आहेत.आपला भारतदेश देखील अशा निवडक देशांमध्ये समाविष्ट आहे.या आजाराला सामोरे जाण्यासाठी भारताने सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळ्या जवळपास बऱ्याच देशांना दिलेल्या आहेत.शेजारील देश असलेल्या अफगाणिस्तानलाही या औषधाची पहिली खेप भारताने पाठविली आहे. औषध येण्यापूर्वीच अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे.

ते म्हणाले, “हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या पहिल्या खेपेमध्ये,पॅरासिटामोलच्या १ लाख गोळ्या आणि ५००० मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानाला पाठविल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांचे आभार.”

 

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, भारतात उपलब्धता वाढत असताना ड्रग्ज आणि वैद्यकीय उपकरणांसह अधिक वस्तू पुरवण्याच्या वचनबद्धतेबद्दल धन्यवाद. # कोविड १९ च्या या कठीण काळात सहयोगी आणि मित्र यांच्यातील जवळचे सहकार्य आपल्याला या संकटांबरोबर लढायला आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी अधिक चांगली तयारी करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment