लॉकडाऊन २.०। सरकारनं जाहीर केली नवी नियमावली; जाणून घ्या कशावर बंदी? तर कशात मिळाली सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत.

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा. दारु, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ही ज्या क्षेत्रांमध्ये नियम शिथिल केले आहेत त्याच क्षेत्रांमध्ये केली जाईल. 20 एप्रिलपर्यंत अशा क्षेत्रांना निवडलं जाईल. ज्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट नाही किंवा कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाही अशा विभागात ही सवलत दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 15 एप्रिलपासून या गोष्टींवर निर्बंध
दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर कडक बंदी.
सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम बंद.
पूर्ण देशात रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर बंदी.
शाळा, महाविद्यालय, कंपन्या, रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद.
कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणं बंधनकारक.
देशात ३ मे पर्यंत बंद सर्व धार्मिक स्थळं बंद.
राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ३ मेपर्यंत बंद
रस्त्यावर थुंकल्यावर दंड, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यावर कारवाई
हॉटस्पॉट क्षेत्रात केवळ आवश्यक सामग्रीचीच उपलब्धता.

२0 एप्रिलनंतर या गोष्टींची अंमलबजावणी (कोरोना हॉटस्पॉट असलेली क्षेत्रं वगळता)
शेतीशी संबंधित सर्व व्यवहारांना सूट.
ग्रामीण भागातल्या काही उद्योगांनाही सूट.
मनरेगाची कामं चालूच राहणार.
ई-कॉमर्स कंपन्यांनाही काम करण्याची परवानगी
आयटी कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करु शकतील.
ज्यांची मुलं पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा कामगारांना शक्यतो वर्क फ्रॉम होम द्यावं
SEZ मधील उद्योगांना काम करण्याची परवानगी.
कुरिअर सेवांना काम करण्याची परवानगी.
लॉकडाऊन अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल आणि लॉज सुरु करणार
मोटर मेकॅनिक, कार पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी.
गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी.
कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये एक तासाचा ब्रेक असावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते

 

Leave a Comment