करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता कोरोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला या लढाईत यश मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here