मोदींशी मतभेद पण सध्या कोरोनाशी एकत्र लढण्याची गरज- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर कोरोना व्हायरसचा पराभूत करु शकतो आणि भारत खूप पुढे निघून जाईल. आपण विभक्त झालो तर व्हायरस आपल्यावर मात करेल, आपण एकत्र झालो तर व्हायरसचा पराभव करण्यात आपण यशस्वी होऊ, असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. आज त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोना व्हायरस संकटात केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी आत्ताच सरकारवर टीका करणार नाही परंतु, काही सूचना मात्र नक्की करेन असं आज राहुल गांधी यांनी म्हणत विरोधी पक्ष म्हणून सरकारला काही सूचनाही केल्या.

लोक घरामध्ये बंद आहेत. बेरोजगारीचे संकट आहे. पण तुम्ही चिंता करु नका, भारत कुठल्याही आजारापेक्षा मोठा देश आहे. भारत या व्हायरसला पराभूत करु शकतो. पण आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपण एकत्र झालो तर व्हायरसला हरवू शकतो. आपण यावर मात केली तर आपण खूप पुढे निघून जाऊ. आपण यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार, असंही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं.

देश एक आणीबाणीच्या संकटात सापडला आहे. अशा वेळी सरकारनं गरीबांसाठी आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. सध्या आपण एका गंभीर स्थितीमध्ये आहोत, अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र यायला हवं, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी, राज्यांच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम राज्यांना ताकद देण्याचं आहे, राज्यांची पैसे पुरवण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शक्तीचा योग्य पद्धतीनं वापर करायला हवं. यासाठी राज्यांना अधिक अधिकार देण्याची गरज आहे’, अशी सूचना राहुल यांनी यावेळी केंद्र सरकारला केली.

करोनाशी लढाई सुरु आहे, आजच विजयाची घोषणा नको
आजच्या पत्रकारांच्या सवांद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशाबाबत एक प्रश्न राहुल गांधी याना विचारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की इतर देशांशी तुलना मला करायची नाही. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य आणि कठोर पावलं उचलून करोनाशी लढा दिला आहे. यावर राहुल गांधी म्हणाले “मला इतर देशांमध्ये काय सुरु आहे त्यावर भाष्य करायचं नाही. एवढंच सांगायचं आहे की आत्ता आपण विजय झाल्याच्या मानसिकतेत जाणं चुकीचं ठरेल”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment