हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संसर्गाचा पहिल्यांदा प्रसार चीनच्या वुहान शहरात झाला. वुहानमधील कोरोनाच्या संसर्गामुळे आपत्तीजनक नाश झाला.हे संक्रमण पसरताच अनेक देशांनी तिथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यादरम्यान वुहानमध्ये बरेच ब्रिटिश नागरिक राहत होते. संक्रमणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ब्रिटनने तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर आणले. परंतु ब्रिटनमध्ये परत आलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाबद्दल खेद वाटू लागला आहे.ते म्हणत आहेत की ते वुहानमध्येच राहिले असते तर बरे झाले असते.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, वुहानमधून परतलेले ब्रिटिश नागरिक आता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहेत. त्यांना वाईट वाटते आहे कारण वुहानहून परत आल्यानंतर तेथे लॉकडाउन उघडले आहे पण आता त्यांना ब्रिटनच्या लॉकडाऊनमध्ये रहावे लागेल. ब्रिटनने क्वॉरेंटाइन ठेवण्याच्या पहिल्या १४ दिवसांत वुहानमधून परत आलेल्या नागरिकांना ताब्यात घेतले. जेव्हा तो क्वॉरेंटाइन ठेवून बाहेर आलेत,त्यांना आता लॉकडाऊनमध्ये रहावे लागेल.
वुहानहून परत आलेल्या ब्रिटिश नागरिकांना लॉकडाऊनमुळे होतोय त्रास
द गार्डियनच्या वृत्तानुसार, वुहानमधून परत आल्यानंतर यूके लॉकडाऊनमध्ये अडकलेले बरेच तरुण आपल्या परत येण्याच्या निर्णयाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहेत.२६ वर्षांचा अँथोनी मे स्मिथ हा एक तरूण आहे. यूकेच्या लिचफिल्डमध्ये राहणारा मे स्मिथ म्हणतो की आपली परिस्थिती विचित्र बनली आहे. पूर्वी तिथे अडकलो होतो तर आता इथे अडकलो आहे.तो म्हणतो की ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू होईल असे त्यांना कधी वाटले नव्हते.आता त्यांना असा विचार करावा लागेल की ते परत येण्याची किंमत मोजत आहेत, हे खरोखर ठीक आहे का?
मे स्मिथ वुहानला आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता.तिथे त्याला इंग्रजी शिकवण्याची नोकरी मिळाली होती. आता ब्रिटनला परत येऊन तो ट्रक चालविण्याचे काम करीत आहे.तो दररोज त्याच्या ट्रकमध्ये झोपतोय,जेणेकरून घरातील वृद्ध आई-वडिलांना त्याच्याकडून संसर्ग होण्याचा धोका होऊ नये.
मी म्हणतो की जर आजची परिस्थिती पाहिली तर मला वाटते की मी परत आलो नसतो तर बरे झाले असते. मी आतापर्यंत तिकडच्या लॉकडाउनमधून बाहेर आलो असतो. दोन लॉकडाउनचा अनुभव घेण्यापेक्षा मी एकच लॉकडाउनला करणे चांगले होते.अँथनी मे स्मिथ सारखे अनेक तरूण आहेत, जे वुहानहून ब्रिटनला परत आले आहेत आणि आता त्यांच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करीत आहेत. हे लोक म्हणतात की ब्रिटीश सरकारने संसर्ग रोखण्यासाठी विलंब केला. येथे परदेशातून परत आलेल्या लोकांना उशिराने क्वॉरेंटाइन ठेवण्यास सुरवात केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.