आकडा वाढतोय! देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३०,००० जवळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिवसेंदिवस कोरोनाचा विषाणू अनेकांनावर हल्ला करताना दिसत आहे. देशातील कोरोनग्रस्तांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी आणखी भर पडली. देशात आणखी ९३४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे हा आकडा ३०,००० काठावर पोहोचला आहे. सध्या देशात २९४३५ करोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. देशभरात २४ तासांमध्ये १,५४३ करोनाचे नवे रुग्ण आढळले. तर देशात एकूण मृत्यू ९३४ इतके झाले आहेत. तसेच आतापर्यंत देशात ६,८६९ रुग्ण बरे झाले.

दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण रोज कमी अधिक असले तरी साथीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment