देशात करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर, १०९ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असून करोनाबाधितांची संख्या ४०६७ वर पोहोचली आहे. तर १०९ जणांचा आतापर्यन्त मृत्यू झाला आहे असून मागील २४ तासात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे २४१ रुग्ण आतापर्यन्त बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली आहे. गेल्या २४ तासांत ६९३ नवे रुग्ण आढळले आहेत. ११४५ रुग्ण तबलिगी मरजकशी संबंधित आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तर राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात सुद्धा दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment