मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघे जण ४० वर्षाखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ झाली आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५३९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची ताजी आकडेवारी पाहण्यासाठी खालील ट्विटर लिंकवर क्लिक करा
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर, पहा ताजी आकडेवारी pic.twitter.com/ihr0Ys2Ha5
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा