यंदा घरातच आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून यंदा ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून फुले जयंती आणि ‘एक दिवा संविधानासाठी’ लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचना पाळूया आणि यशस्वीपणे जिंकत इतिहास घडवूयात असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

येत्या काही दिवसात शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले की, “आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम ८ एप्रिलला होणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करा. १४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण ‘एक दिवस संविधानासाठी’ लावून जयंती साजरी करुया.” असं आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment