Thursday, March 30, 2023

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत दाम्पत्याला मारहाण

- Advertisement -

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या या परिसरात जमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दाम्पत्याला नात्यातीलच काही लोकांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने काठी आणि चपलेने मारहाण केली आहे. पीडित व्यक्ती खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला अमानुष मारहाण करत शिवीगाळ केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीलादेखील मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण
मारहाण करण्यात आलेल्या पती पत्नीचे नाव बाबाजी तिकोने आणि शारदा तिकोने असे आहे. तर मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव दिनकर तिकोने आहे. त्याने आपल्या कुटुंबातील मुलांच्या मदतीने या दाम्पत्याला अमानुषपणे मारहाण केली. मागील काही दिवसांपासून आरोपी आणि पीडित दाम्पत्यांमध्ये जमिनीवरून वाद सुरु होता. यातून त्यांच्यात अनेकवेळा भांडणे देखील झाले आहेत. पण यावेळी भांडण मोठ्या प्रमाणात वाढले आणि आरोपीने पीडित दाम्पत्याला आपल्या मुलांच्या मदतीने अमानुष मारहाण केली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये आरोपी पीडित दाम्पत्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करताना दिसत आहे. यावेळी आरोपींने जखमी व्यक्तीच्या पत्नीला लज्जास्पद शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. याप्रकरणी पीडित दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र तरीदेखील आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे.