व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ठाणेमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे क्राईम ब्रांचने ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये 2 अभिनेत्रींना अटक करण्यात आले आहे. हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट एका खाजगी सोसायटीमध्ये सुरु होते. याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळताच त्यांनी लगेच धाड टाकून हि कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून 3 एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.

ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1कडून हि कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. ज्या एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवत होत्या. वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूडशी संबंधीत आहेत. कोविड 19 च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळाल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटचीं लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे समजत आहे. एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट सुरू होते त्यामध्ये बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये एक मोठं रॅकेट असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.