Saturday, March 25, 2023

WTC फायनलच्या आधी टीम इंडियासाठी आहे ‘हि’ मोठी समस्या, अश्विनकडून खुलासा

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. आज भारतीय संघ मुंबईतून इंग्लंडला रवाना होणार आहे. ते उद्या ३ जून रोजी इंग्लंडमध्ये पोहोचणार आहेत. इंग्लंडमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर भारतीय संघ थेट न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या फायनल सामन्याबद्दल बोलताना भारताचा फिरकीपटू आर.अश्विन म्हणाला, इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ एकही सराव सामना खेळणार नाही आहे हीच मोठी समस्या आहे. भारतीय खेळाडू कोणत्याही सरावाशिवाय थेट मैदानात उतरणार आहे आणि हेच मोठे आव्हान असणार आहे.

काय म्हणाला अश्विन
सरावाची कमतरता हाच मोठा काळजीचा विषय असणार आहे. तसेच भारतीय खेळाडू तेथील परिस्थितीशी लवकर जुळवून घेतील, जसे आम्ही ऑस्ट्रेलियात केले होते. कोरोनाच्या प्रसारामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर आम्ही कोणीच क्रिकेट खेळले नव्हतो. त्यामुळे आमच्यासमोर हेच मोठे आव्हान असणार आहे. पण तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊन आम्ही ऑस्ट्रेलिया सारखीच कामगिरी करू.

- Advertisement -

एखाद्या सामन्यासाठी तयारी करणे आणि एखादा सराव सामना खेळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आयपीएलनंतर इतक्या मोठ्या काळानंतर मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसोबत दोन सामने खेळणार आहे. ज्याचा फायदा न्यूझीलंडला नक्कीच होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामने पाहून आम्ही काही गोष्टी शिकू शकतो. या सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू कशी कामगिरी करतात त्यावरून आम्ही पुढची योजना करू शकतो