Tuesday, March 21, 2023

मोदी सरकारने कोरोनाच्या युद्धात शरणागती स्वीकारली आहे- राहुल गांधी

- Advertisement -

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेस नेतेअध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे शरणागती स्वीकारली असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी ‘द प्रिंट’ वेबसाईटवरील एक लेख रिट्विट करत म्हटलं आहे कि, ‘कोविड १९ चा प्रादुर्भाव हा देशातल्या इतर भागांमध्येही वेगाने वाढतो आहे. करोनाचा मुकाबला करुन त्याला हरवणार अशा वल्गना दिल्या गेल्या प्रत्यक्षात मोदी सरकारकडे यासाठीचे कोणतेही धोरण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे शरणागती स्वीकारली आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात या कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडे कोणतीही योजना नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”