हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्त्राईलने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोनाव्हायरसवरची लस तयार केली असून ती लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. इस्त्रायली संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी याविषयी सांगितले की आमच्या डिफेन्स बायोलॉजिकल संस्थेने कोरोना विषाणूवरची लस बनविली आहे. बेनेट यांच्या म्हणण्यानुसार,या संस्थेने कोरोना विषाणूच्या एंटीबॉडीज तयार केल्या आहेत.इस्त्राईलचा असा दावा आहे की ही लस विकसित केली गेली आहे आणि त्याचे पेटंट तसेच उत्पादन प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
टाइम्स ऑफ इस्त्राईलच्या अहवालानुसार कोरोना लस बनविल्याचा दावा करणाऱ्या इस्त्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च नावाची ही संस्था इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयात अत्यंत गुप्तपणे काम करते.रविवारी जैविक संशोधन संस्थेला भेट दिल्यानंतर बेनेट यांनी ही घोषणा केली. संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार,या एंटीबॉडीज मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करते आणि संक्रमित लोकांच्या शरीरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा नाश करते.
#BREAKING: Joint statement by the Israeli Ministery of Defense and the Israel Institute for Biological Research: A significant breakthrough has been achieved in finding an antidote to the Corona virus that attacks the virus and can neutralize it in the sick body
— Amichai Stein (@AmichaiStein1) May 4, 2020
पेटंट मिळताच उत्पादन सुरू होईल
इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की ही लस विकसित केली गेली आहे आणि आता त्यची पेटंट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांशी व्यावसायिक स्तरावर उत्पादनासाठी चर्चा सुरू होईल. बेनेट म्हणाले, “या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.” मात्र ही लस मनुष्यांवर वापरली गेली आहे की नाही हे इस्रायलने सांगितलेले नाही. बेनेट म्हणाले की, इस्त्राईल आता आपल्या नागरिकांचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
पूर्वी देखील दावा केलेला
याआधीही,इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठात काम करणाऱ्या एका इस्त्रायली शास्त्रज्ञाने कोरोनाव्हायरसच्या विषाणूंसाठी लस डिझाइनचे पेटंट मिळवले होते, त्यानंतर त्या लसीची चर्चा सुरू झाली. तेल अवीव विद्यापीठाने एक निवेदनात म्हटले होते की हे पेटंट ‘युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस’ ने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही लस कोरोना विषाणूच्या संरचनेस थेट इजा करून निष्प्रभावी करण्यास सक्षम आहे. जॉर्ज एस. वाईज फॅकल्टी ऑफ लाइफ सायन्सेस, स्कूल ऑफ मॉलिक्युलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर जोनाथन गार्शोनी यांनी ही लस विकसित केली आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की हे औषध विकसित करण्यास कित्येक महिने लागू शकतात.यानंतर, त्याच्या क्लिनिकल चाचणीचा टप्पा सुरू होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.