Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखे पर्याय आणखी आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. या बैठकीनंतर माहिती देताना शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आता युझर्सनाना UPI वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधाही मिळू शकेल. त्यानंतर आता बँकांकडून युझर्सना प्री-अप्रूव्‍ड रक्कम दिली जाईल, जी खात्यात पैसे नसतानाही वापरता येऊ शकेल.

How Will UPI-Credit Card Linking be Different from Credit Card Payment on  Paytm, MobiKwik?

गव्हर्नर दास पुढे म्हणाले की,” सध्या देशात UPI च्या माध्यमातून होणाऱ्या ट्रान्सझॅक्शनमध्ये वेगाने वाढ होते आहे. ते लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय करण्यासाठी आणि युझर्सना आणखी सुविधा देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता Paytm, PhonePe किंवा Google Pay सारख्या Apps द्वारे UPI पेमेंट करणाऱ्या युझर्सना आता प्री-अप्रूव्‍ड क्रेडिट लाइन दिली जाईल. मात्र युझरला किती रक्कम दिली जाईल हे बँका किंवा वित्तीय संस्थाच ठरवतील. तसेच ही रक्कम खात्यात पैसे नसतानाही युझर्सना वापरू शकतील. Credit Card

Google Pay, Paytm किंवा Phonepe वापरत असाल तर 'ही' बातमी वाचून तुम्हाला  धक्का बसेल... upi merchan transactions Govt introduces surcharge for Gpay  Paytm others on transactions above ₹2,000

क्रेडिट लाइन म्हणजे काय ???

क्रेडिट लाइन म्हणजे बँकेने युझर्ससाठी सेट केलेली खर्चाच्या रकमेची मर्यादा आहे. एक प्रकारे हे ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसारखेच असेल. जिथे ग्राहकाला आपल्या गरजेनुसार रक्कम वापरून नंतर व्याजासहीत ती परत करावी लागेल. मात्र याबदल्यात बँकेकडून व्याज देखील आकारले जाईल. तसेच प्रत्येक ग्राहकाच्या जोखीम क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतरच बँकांकडून प्री-अप्रूव्‍ड क्रेडिट लाइन तयार केले जाईल. Credit Card

Paytm, PhonePe, Google Pay, other mobile wallets to be interoperable from  April 2022 - BusinessToday

क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करता येईल

शक्तिकांत दास म्हणाले की,” भारतात सध्या UPI द्वारे जास्तीत जास्त पेमेंट केले जात आतहे. त्यामुळे रिटेल ट्रान्सझॅक्शनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. बँकांकडूनही UPI च्या फायदा लक्षात घेऊन आपले प्रॉडक्ट आणि फीचर्स विकसित केले गेले आहेत. तसेच एमपीसीच्या बैठकीत आता क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि सध्या,युझर्सना रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करता येतील. Credit Card

Digital Wallets and the Popularity of Mobile Pay​

UPI ट्रान्सझॅक्शनमध्ये झाली वाढ

NPCI च्या आकडेवारीवरून लक्षात येईल, एकूण 8.7 अब्ज ट्रान्सझॅक्शन हे UPI द्वारे करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वार्षिक आधारावर 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच जर आपण गेल्या 12 महिन्यांच्या डेटावर नजर टाकली तर डेली सरासरी 36 कोटी ट्रान्सझॅक्शन हे UPI द्वारे झाले आहेत. जे फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या 24 कोटी ट्रान्सझॅक्शनपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त आहे. Credit Card

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rupay.co.in/rupay-credit-card-on-upi

हे पण वाचा :
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर