Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणे फायद्याचे बनवले आहे.

Benefits of paying rent through credit card | Housing News

मात्र, आता असे करणे महागात पडणार आहे. कारण थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मद्वारे आकारल्या जाणार्‍या शुल्काव्यतिरिक्त, आता बँकांनीही यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय यांसारख्या अनेक बँका त्यांच्या Credit Card धारकांकडून भाडे पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

Can You Pay Your Rent with a Credit Card or Venmo?

थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म चार्ज

अनेक भाडेकरू Paytm, Cred, NoBroker, PayZap, Red Giraffe, Mobikwik, PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर रेसिव्हर्सच्या पर्यायामध्ये घरमालकाच्या बँक खात्याचे तपशील किंवा UPI ऍड्रेस एंटर करायचे आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करायचे. मात्र, हे थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मकडून Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी सर्व्हिस चार्ज आकारला जातो.

Pay rent using credit card with Housing's Pay-Rent feature

Credit Card कंपन्या/बँकाही आकारत आहेत अतिरिक्त शुल्क

याआधी, ICICI बँकेने क देखील आपल्या Credit Card धारकांकडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी एक टक्का प्रोसेसिंग चार्ज आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. 20 ऑक्टोबर 2022 पासून हा प्रोसेसिंग चार्ज लागू कऱण्यात आला आहे. त्याच वेळी, SBI कडूनही क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते आहे. SBI आता क्रेडिटकार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 99 रुपये + GST आकारत आहे. 15 नोव्हेंबर 2022 पासून SBI क्रेडिट कार्डचा हा बदल लागू झाला आहे. तसेच बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारी 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे भाड्याच्या पेमेंटवर 1% शुल्क देखील आकारत आहे. त्याच प्रमाणे 3 मार्च 2023 पासून, IDFC फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांनाही क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर 1% शुल्क भरावे लागेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bobfinancial.com/fees-charges.jsp

हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत ​​आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स