इंग्लंडच्या केव्हिन पीटरसनने केला तमिळ गाण्यावर डान्स;ए.आर.रेहमान यांनी शेअर केला तो मजेदार व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले असून, यामध्ये खेळाडूंसह कोमेंटरी करणारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. कधी खेळाडू त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत चॅट करताना दिसतात तर कधी त्याच्या आयपीएल मधील संघासमवेत.यावेळी खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी आणि त्याच्याशी संबंधित काही मजेदार किस्से सांगताना दिसतात.

पण आजकाल टिकटॉक वरही खेळाडू बरेच अ‍ॅक्टिव झाले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये टिकटॉकचा ट्रेंड युजवेंद्र चहलने सुरू केला होता. तो सतत नवीन टिकटॉक व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करत असतो. आता या मालिकेत त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनही सामील झाले आहेत.


View this post on Instagram

 

A post shared by @arrahman on May 11, 2020 at 9:29am PDT

 

केविन पीटरसनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो तामिळ गाण्यांवर नाचताना दिसत आहे. भारतीय गायक ए.आर.रेहमानला हा व्हिडिओ इतका आवडला की त्याने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तमिळ चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडतोय आणि आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

क्रिकेटमधून निवृत्त झालेला पीटरसन अनेकदा भारतीय क्रिकेटविषयी वक्तव्य करून चर्चेत असतो. अलीकडेच त्याचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला होता की पीटरसनच्या आयपीएल कराराबद्दल त्याच्या संघातील सहकारी खेळाडू ईर्ष्या करीत असे. वॉन म्हणाला होता की, “मला वाटते त्या वेळी खेळाडू खूपच ईर्ष्यावान होते आणि आता ते खेळाडू हे नाकारू शकतील, पण मला वाटते की ती अशी वेळ होती जेव्हा पीटरसनला आयपीएलचा मोठा करार मिळाला होता.”

त्याला उत्तर म्हणून पीटरसन म्हणाला, “आश्चर्य. मी अजूनही चर्चेत आहे तर. मी याबद्दल पुन्हा बोलू नये अशी विनंती करु शकतो. आम्ही सर्व माझ्या कारकिर्दीत आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टींपेक्षा पुढे गेलो आहोत. ज्याच्याबद्दल बोलले जाऊ शकते. आम्ही आत्ता एका कठीण टप्प्यातून जात आहोत जिथे सकारात्मकतेची आवश्यकता आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.