बर्थ डे स्पेशल : हे खास शतक आठवून बीसीसीआयने सचिनला वाढदिवशी दिली आगळीवेगळी भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज ४७ वर्षांचा झाला आहे.देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे सचिन आपला हा ४७ वा वाढदिवस डॉक्टर, परिचारिका आणि या विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात सहभागी असलेल्यांचा सन्मान म्हणून साजरा करत नसला तरी या खास प्रसंगी बीसीसीआयने त्याचा वाढदिवसाची एका वेगळ्या प्रकारे भेट दिली आहे.

Photo Gallery : Sachin Tendulkar scored 103 against England in ...

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ २००८ चा आहे जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले ४१ वे शतक ठोकले होते. त्यावेळी सचिनने २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या देशवासियांच्या नावे आपले हे शतक समर्पित केले होते.

कसोटी क्रिकेटमधील सचिनचे ४१ वे शतक इंग्लंडविरुद्ध आले.चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धचा सामना खेळला गेला.तेथे ३८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय यजमान संघ ६ गडी राखून विजयी ठरला.या सामन्यात युवराजसिंगसह सचिनने सामन्यात पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती.

Sachin Tendulkar 's advises kids to work hard and fulfil their ...

कसोटी क्रिकेटमधील या शतकानंतर सचिनने कसोटीत आणखी १० शतके ठोकली जो एक विश्वविक्रम आहे.क्रिकेटच्या या स्वरुपात कोणत्याही खेळाडूने ५० शतके ठोकलेली नाहीत.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment