9 मॅचनंतर IPLमध्ये मिळाली संधी, बॅटींग न करता ‘या’ खेळाडूने एका बॉलमध्ये बदलला सामन्याचा निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये (IPL) लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 रनने थरारक विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 210 रन केले होते. 211 रनचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात थोडी खराब झाली. त्यांचे दोन्ही ओपनर स्वस्तात माघारी परतले मात्र तरीदेखील त्यांनी जिद्द न हारता मधल्या फळीतील फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत सामना केकेआरच्या दिशेने झुकवला. यादरम्यान सामन्याच्या निर्णायक क्षणी 9 मॅचनंतर टीममध्ये संधी मिळालेल्या एव्हिन लुईसने अफलातून कॅच घेत लखनऊला विजय मिळवून दिला.

केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 21 रन हवे होते. मार्कस स्टॉयनिसच्या शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलवर रिंकू सिंहने 18 रन काढले. त्यामुळे विजयाचं समीकरण 2 बॉल 3 रन असे केकेआरच्या बाजूने झुकले होते. त्या ओव्हरचा पाचवा बॉल रिंकूनं हवेत जोरदार टोलावला. त्यावेळी एव्हिन लुईसने डीप बॅकवर्ड पॉईंटवरून 17 मीटर लांब पळत येत डाईव्ह लगावली आणि एका हाताने रिंकू सिंहचा अफलातून कॅच घेतला. अत्यंत दबावाच्या परिस्थितीमध्ये त्यानं हा कॅच घेत केकेआरला सर्वात मोठा धक्का दिला. त्याच्या या कॅचची या आयपीएल (IPL) सिझनमधील सर्वोत्तम कॅचमध्ये नोंद करण्यात आली आहे.

लुईसचा 9 मॅचनंतर लखनऊच्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण, क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल या ओपनिंग जोडीनं संपूर्ण 20 ओव्हर्स खेळून काढल्यामुळे त्याला बॅटींग करायला मिळाली नाही. तो बॉलिंगही करत नाही. संपूर्ण मॅचमध्ये फार संधी न मिळालेल्या लुईसनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक कॅच घेऊन संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले. केकेआरविरुद्धच्या या विजयासोबतच लखनऊ प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन टीम प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी बंगलोर, पंजाब, हैद्राबाद, राजस्थान आणि दिल्ली यांच्यात आयपीएलच्या (IPL) प्ले-ऑफची स्पर्धा रंगणार आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment