वर्ल्ड कप फायनलमधील पराभव विसरु शकलो नाही – केन विल्यमसन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाला विसरलेला नाही. अंतिम सामन्यात झालेला नाट्यमय पराभव त्याच्या कारकीर्दीतील अपयश होते का हे विल्यमसनला अजूनही उमगलेले नाही.

मागीच्या वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्धारित षटक आणि सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडला चौकार आणि षटकारांच्या मोजणीच्या आधारे विजयी घोषित केले गेले.

विल्यमसन क्रिकबझ संकेतस्थळावर आयोजित एका शोवर म्हणाला, ” मला अजूनही समजत नाही आहे तो आयुष्यातील उतार होता कि चढाव. मी अजूनही ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कधीकधी ते शोधणे कठीण होते. हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे मान्य करावेच लागेल. “

तो म्हणाला, “हा एक चांगला सामना होता आणि मला ते समजणे कठीण होते कारण मी या सामन्याचा एक भाग होतो.” वर्ल्ड कपच्या त्या अंतिम सामन्याचा निकाल बर्‍यापैकी नाट्यमय झाला होता. यानंतर क्रिकेट विश्वात अशी चर्चा होती की इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जावे, परंतु तसे होऊ शकले नाही.

त्याचबरोबर पावसाने व्यत्यय आणलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करून स्पर्धेबाहेर जाण्याचा मार्ग दाखविला. हा उपांत्य सामना रिझर्व्ह डे ला खेळवण्यात गेला. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ खूप मजबूत स्थितीत होता मात्र रिझर्व्ह डेच्या दिवशी गेलेला हा सामना न्यूझीलंडने जिंकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment