लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन हा सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहे. या तयारीबरोबर तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. अश्विनने यूट्यूबवरील एका कार्यक्रमात ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना अगोराम यांच्याशी चर्चा केल्यानंतर हि मागणी केली आहे.
काय म्हणाला आर. अश्विन
“आपण ‘दुसरा’ बंद करणे योग्य नाही, तर उलट अन्य स्पिनर्सना योग्य प्रकारे कोपर वाकवण्याची परवानगी द्यायला हवी. यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सर्वाना मायनस 15 ते 20-22 अंशापर्यंत बॉलिंगची परवानगी द्यायला हवी.” अशी मागणी अश्विनने केली आहे. प्रसन्ना अगोराम यांनीदेखील अश्विनच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. स्पिनर्सनी जबाबदारी ‘दुसरा’ बॉल टाकला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले प्रसन्ना अगोराम
“मला बॅट आणि बॉलमध्ये योग्य संतुलन बघायचं आहे. बॉलर्सना देखील बॅट्समनप्रमाणे स्वातंत्र्य हवे. मला बॉलर्सनी टी 20 क्रिकेटमध्ये 125 धावसंख्येचं संरक्षण केलेलं पाहायचं आहे.दुसरा बाबतच्या नियमामध्ये आयसीसीने बदल करुन याची मर्यादा 18.6 अंशापर्यंत करावी. बॉलर्सना दुसरा टाकण्याची परवानगी मिळाली तर बॅट्समन्सना काही वेगळा विचार करावा लागेल.” असे प्रसन्ना अगोराम म्हणाले आहेत.
पाकिस्तानच्या बॉलर्सची केली प्रशंसा
पाकिस्तानचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताक हा ‘दुसरा’ बॉल योग्य पद्धतीने टाकणारा बॉलर होता असे अश्विन म्हणाला. शोएब मलिकदेखील ‘दुसरा’ बॉल योग्य पद्धतीने टाकणारा स्पिनर होता.