हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने जगभर पाऊल आपले ठेवले आहे, या साथीने पाकिस्तानलाही सोडलेलले नाहीये. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ३ हजाराहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे तर ४५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे सर्व मोठे क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांना घरीच रहाण्याचे आवाहन करत आहेत,मात्र नुकताच पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात तो गर्दी जमवताना दिसत आहे.
होय, या व्हिडिओमध्ये सरफराज अहमद नात-ए रसूल ही प्रेषित मोहम्मदच्या स्तुतीसाठी लिहिलेली कविता वाचताना दिसत आहे. लोकांनी ही कविता ऐकण्यासाठी त्याच्या जवळच गर्दी केली नाही तर त्याचा व्हिडिओ बनवून त्याचे कौतुकही केले.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सरफराजने हातात ग्लब्स घातले होते आणि त्याच्याकडे मास्कसुद्धा होता. ते पाहिल्यावर असे जाणवते की तो या महामारीच्या दरम्यान काहीतरी दान देऊन लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे, परंतु या कविता म्हणून त्याने सोशल डिस्टसिंगच्या नियमाला अगदी धाब्यावरच बसवले आहे.
उल्लेखनीय बाब ही आहे की काल भारतात या आजाराविरोधात पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर देशवासीयांनी दिवे, मशाली पेटवली आणि एकता दर्शविली. यात क्रीडा विश्वही मागे राहिला नाही आणि भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनीही दिवा पेटवून कोरोनाविरूद्धच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.विराट कोहलीने ट्विट केले की, “एकात्मतेने प्रार्थना केल्याने फरक पडतो. सर्वांसाठी प्रार्थना करा आणि एकत्र उभे रहा. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार