व्हीव्हीएस लक्ष्मणने अनिल कुंबळेचे कौतुक करताना सांगितले कि,’ मोठा खेळाडू…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी, भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले होते की,पुढील काही दिवस ज्या खेळाडूंसोबत तो खेळला आहे आणि ज्यांनी त्याच्यावर मोठा प्रभाव टाकला आहे अशा खेळाडूंना तो आठवेल. याच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मणने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याला आठवले आणि आता त्याने टीम इंडियाचा लेगस्पिनर आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या सन्मानार्थ एक ट्विट केले आहे. कुंबळेची स्तुती करताना लक्ष्मण म्हणाला की,’ तो हरप्रकारे खूप मोठा खेळाडू आहे आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तो नेहमीच तयार असे.

लक्ष्मणने त्यांचे कुंबळेला आठवताना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहऱ्यावर पट्टी लावलेली दिसत आहे. २००२ मध्ये अँटिग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील हा फोटो आहे ज्यामध्ये कुंबळेने मोडलेल्या जबड्याला पट्टी लावून गोलंदाजी केली होती.

 

लक्ष्मणने ट्वीट केले, “तो एक मोठा खेळाडू होता, तो सर्व शक्यतांपेक्षा पुढे होता आणि त्याने नेहमीच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. या छायाचित्रात दाखविलेले धैर्य अनिल कुंबळे मधील सर्वोच्च आहे. कधीही हार मानू नका. मग काहीही असो, कुंबळेचे हेच वैशिष्ट्य त्याला एक महान क्रिकेटर बनवते. ”
२००२ मध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात कुंबळेला मारवीन डिलनचा एक उसळता चेंडू जबड्याला लागला होता. मात्र असे असूनही, त्याने तोंडाला पट्टी लावून सलग १४ षटके गोलंदाजी केली.

कुंबळे हा भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. त्याने भारताकडून १२२ कसोटी सामने खेळले आहेत आणि ६१९ बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात कुंबळेने भारताकडून २७१ सामने खेळले असून त्यांच्या नावावर ३३७ बळी घेतले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.