निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष विजयी उमेदवार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला आहे.तसा अहवाल भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षकांनी पाठविला असल्यामुळे रवि राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकूळ, वनविभागाच्या हत्ती कॅम्पला विरोध दर्शवत केली तोडफोड

पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत.तर अल्लापल्ली-भामरागड आणि कमलापूर-दामरंचा या दोन्ही मार्गावर झाड तोडून रस्ता अडविला आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

…त्या आईनेच केला होता चिमुरडीचा खुन; मयत आईवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

देऊळगावराजात २० वर्षीय महिलेचे प्रेत सापडल्यानं खळबळ

देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारातील खडकपूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये आज सकाळी २० वर्षीय विवाहितेचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराला वाचवतांना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात वरून मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात मजूर दबले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तीन अग्निशामक जवानांच्या अंगावरही मातीचा ढिगारा पडल्याने गाडले गेले. या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला आहे. सदर दुर्घटना दापोडी येथे रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे दुःखद निधन

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हँन नदी पाञात पडुन ७ ठार , 13 जण जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला

पिंपरी : आलिशान कार चोरणारा आरोपी गजाआड

सर्व्हिसिंगसाठी आलेली आलिशान कार बावधन येथून चोरण्यात आली होती . या गुन्ह्यातील आरोपीस नुकतीच गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. वसिम कासिम सय्यद (वय ३२, रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकास परदेशी यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.