‘त्या’ गूढ खुनाचे आरोपी २४ तासात गजाआड

जिल्ह्यातील तिरोडा येथील शहीद स्मारक जवळील नगर परिषदेच्या सार्वजनिक विहिरीत १७ वर्षीय युवकाचे प्रेत आढळून आले होते. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केल्याने खुनातील आरोपीला २४ तासांत गजाआड करण्यात त्यांना यश आले आहे. ऋषभ करोसिया असं मयत युवकाचे नावं असल्याचे समजते आहे.

‘जंजीर आज भी जिंदा है!’ १९९३ मुंबई बॉम्बस्फोट तपासात बजावली महत्वाची भूमिका

 भारत माझा देश आहे…? सारे भारतीय माझे बांधव आहेत…? माझ्या देशावर माझे प्रेम आहे…? माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…?आपली हि प्रतिज्ञा पुन्हा एकदा पडताळून पहायला हवी अशी आजची परिस्थिती आहे. व्यवस्थित या प्रतीज्ञेकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल कि, प्रत्येक विधानामागे एक अदृश्य प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आठवतात ते जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज. ते एका ठिकाणी म्हणतात ” धर्माचा ध्वज धर्मांधांच्या खांद्यावर जातो, तेव्हा वाहते ते त्याच धर्माचे असते व मग उकिरड्यावरचे कागद खाणारे गाढव जसे मनाचे श्लोक व मटक्याचे आकडे यात भेद करीत नाही तशी स्थिती अस्तित्वात येते “

पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालणं चालकाला पडलं महागात

औरंगाबाद प्रतिनिधी । नाकाबंदी सुरु असताना कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही त्याला न जुमानता रिक्षा पोलिसांच्या अंगावर घालत सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा रिक्षाचालक कुणाल प्रदीप सोनकांबळे याला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार ३०० रुपयांचा दंड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक … Read more

धक्कादायक !! गोंदिया शहरात मित्रांनीच चिरला मित्राचा गळा

गोंदिया शहराच्या मनोहर चौकात १० नोव्हेंबरला चायनिजच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या १७ वर्षीय कान्हा शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. त्याच्याच दोन मित्रांनी एका वर्षाआधी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ही हत्या केली. या हत्येने गोंदिया शहरात दिवसेंदिवस बिघडत चालेली कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण समोर आली आहे. अल्पवयीन तरुणांच्या हातून घडणाऱ्या हत्या, मोठे गुन्हे , यावर पोलिसांनी नियंत्रण आणावं तसेच दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी गोंदिया शहराच्या दुर्गा चौकातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चचा समारोप नेहरू चौकात करण्यात आला.

न्याय! मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिकेला ५ वर्षांची कडक शिक्षा

शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेतानाचा शिक्षिका शितल अवचार हिचा विडिओ झाला होता.  त्यानुसार या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणावर आता जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.

लाखो रुपयांच्या अवैध दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला चक्क ‘बुलडोझर’

जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा बुलडोझर चालवत नष्ट केला. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यासाठी पोलिसांनी या दारूसाठ्यावर थेट बुलडोझर चालवला. 

रेल्वे ट्रॅकवर हाय होल्टेज ड्रामा ! ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला तरुण थोडक्यात बचावला

रेल्वे पोलिस जीआरपीच्या जवानांनी मंगळवारी डाब्रा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर ओव्हरहेड वायरमधून एका युवकाची सुटका केल्याची घटना घडली. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गावर वीज बंद केली. त्यामुळं हा तरुण थोडक्यात बचावला आहे.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली … Read more

मुलाला पोहायला शिकवण वडिलांना पडलं महागात! बापलेकाचा बुडून मृत्यू

करमाळा तालुक्यातील मलवडी इथं बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. शिवाजी कोंढलकर हे आपल्या मुलाला विहरीत पोहायला शिकवत होते. या दोघांचाही विहरीत बुडून मृत्यू झाला.

वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात, १९ प्रवासी जखमी

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.