पठ्ठ्यांनी थेट JCB नेच फोडले ATM; मशिनमध्ये 27 लाख रोख रक्कम (Video)

0
179
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | आरग ( तालुका मिरज ) येथे जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एटीएम च्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षारक्षकाचा अभाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आरग येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील आरग पोलीस मदत केंद्र शेजारी ॲक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पेट्रोल पंपावरील उभा करण्यात आलेले जेसीबी चोरट्यांनी चोरी करून गावातील ॲक्सिस एटीएम केंद्र जवळ आणला आणि जेसीबीच्या साह्याने एटीएम सेंटर फोडल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/390779986238018/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

पुढे जेसीबीच्या साहाय्याने एटीएम मशीन उचलून सेंटरच्या बाहेर घेतले. पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने एटीएमच्या मशीन वर जोरदार घाव घातला. जेसीबीचा मारा इतका जोरदार होता की एटीएम मशीनची तीन तुकडे केले. परिस्थितीचा अंदाज घेता चोरट्यांनी एटीएम मशीन 50 मीटर अंतरावर टाकून जेसीबी घेऊन पळ काढला. पण चोरट्यांना पैसे चोरण्यात अपयश आले. चोरलेला जेसीबी लक्ष्मीवाडी रोड वर सकाळी आढळून आला. सकाळी घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम , गुन्हे अन्वेषण शाखा विभागाचे सर्जेराव गायकवाड, मिरज ग्रामीण सीपीआय चंद्रकांत बेदरे यांनी भेट दिली. याबाबत अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here