Cristiano Ronaldoची ‘त्या’ 13 वर्षे जुन्या खटल्यातुन निर्दोष मुक्तता

Cristiano Ronaldo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पोर्तुगालचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलर क्रिस्टीयानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याची 13 वर्ष जुन्या खटल्यात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत त्याच्यावर अमेरिकन कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची कारवाई थांबवत कोर्टाने रोनाल्डोची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण ?
2009 साली नेवादाच्या कॅथरीन मायोग्रा या महिलेने रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप करत खटला दाखल केला होता. लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने तिच्यावर हल्ला केला आणि मग तिच्यावर अतिप्रसंग केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणाची नुकसान भरपाई म्हणून त्या महिलेने रोनाल्डोकडून (Cristiano Ronaldo) 3.75 लाख अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती. शनिवारी या संदर्भात कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत रोनाल्डोची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच निकालपत्रात रोनाल्डोवर गंभीर आरोप करणाऱ्या नेवादाच्या वकिलांना समज देण्यात आली. या खटल्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचे योग्यपद्धतीने पालन न केल्याचा ठपकाही त्या महिलेच्या वकिलावर ठेवण्यात आला.

रोनाल्डो (Cristiano Ronaldo)सध्या गर्लफ्रेंड जॉर्जिना आणि पाच मुलांसमवेत पोर्तुगालमध्ये वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण दुर्दैवाने त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला. रोनाल्डोने सोशल मीडियावरून याची माहिती दिली होती. रोनाल्डोने पाच वेळा फुटबॉल जगतातील मानाचा बॅलन डी ओर किताब जिंकला आहे. तसेच चार वेळा युरोपिय गोल्डन शूज पुरस्कारसुद्धा पटकावला आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल मारण्याचा विक्रम क्रिस्टीयानो रोनाल्डोच्याच (Cristiano Ronaldo)नावावर आहे.

हे पण वाचा :
काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका