…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही ही संधी घेतली होती. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो. लेकिन बच्चन तो बच्चन है, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, लेकिन अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है. त्याप्रमाणे शेवटी ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. शरद पवारही म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली.

जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत. आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, अशा टोला शेवटी सुळे यांनी भाजपला टोला लगावला.

Leave a Comment