कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे नाव अम्फान असे आहे.

किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळ येण्याची भीती
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, कमी दाबामुळे १८ मे रोजी ओडिशाच्या किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ मे आणि २० मे रोजी पश्चिम बंगालमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मोसमी वारे आणि वातावरणीय परिस्थिती अनुकूल दिसत आहेत, त्यामुळे येत्या २४ तासांत १६ मेच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगाल उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होईल.

महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबत माहिती दिली
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, जर हे वादळ विकसित झाले तर ते पहिले उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेने १७ मे रोजी जाईल आणि त्यानंतर ते उत्तर-पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, हे ‘चक्रीवादळ’ पावसाच्या प्रगतीस मदत करेल. हे अम्फान चक्रीवादळ या वर्षातळे पहिले ‘चक्रीवादळ ‘असेल.

 

आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आयएमडीने आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून मच्छीमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस तसेच समुद्राच्या दक्षिणेस जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्राच्या या भागांत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनाही लगेच परतण्यास सांगण्यात आले आहे.

 

केरळमध्ये बर्‍याच ठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी केला
भारतीय हवामान खात्याने केरळ तसेच दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, अशा अनेक ठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थान, आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच तमिळनाडू येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ मे रोजी संध्याकाळी ५५ ते ६५ कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता सांगितली आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment