दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते बारा तास कॉम्पुटर वरच जातात. या गोष्टीमुळे अनेक जणांना डोळ्याचा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या काळात त्वचेच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून तज्ञ काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. कॉम्पुटरच्या स्क्रीनमधून काही किरणे बाहेर पडतात. ती किरणे फक्त डोळ्यांना त्रास देत नाही तर त्यामुळे त्वचेच्या सुद्धा समस्या निर्माण होतात. यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करता येतील याचा अभ्यास करणार आहोत.

सनस्क्रीन चा वापर —

त्वचेच्या एक्स्पर्ट नि सांगितले आहे की, जर आपण दिवसभर घरून कॉम्पुटर च्या समोर बसून काम करत असाल तर तुम्ही सन स्क्रीन चा वापर करा म्हणजे लॅपटॉप पासून निघणारी अतिनील किरणे आपल्याला त्रासदायक ठरणार नाहीत. दर दोन तासांनी आपल्या डोळ्यांवर एसपीएल 30 लावा त्यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही.

ब्रेक घ्या—-

सतत लॅपटॉप वर बसल्यानंतर काही काही वेळानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. लॅपटॉप मधून निघणारी अतिनील किरणे आपल्या त्वचेला हानी पोहचवणार नाहीत. सतत चेहरा धुवा. जी कामे कागद आणि पेन च्या मदतीने होणार आहेत ती कामे करताना कागद आणि पेन वापरा. लॅपटॉप वर बसून पीडीएफ फाइल वाचण्यापेक्षा पुस्तके वाचा.

टोनर वापरा —

सतत लॅपटॉप वर बसल्याने चेहरा कोरडा होतो. त्यासाठी तुम्ही टोनर चा वापर करा. अल्कोहोल मुक्त टोनर चा वापर करा.

मसाज—

जास्त वेळ आपण लॅपटॉप वर बसल्याने आपला चेहरा निस्तेज होतो. आपली त्वचा ही पुनर्जीवित करण्यासाठी चेहऱ्यावर मसाज करणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी चागल्या तेलाचा आणि क्रीम चा वापर करा. आपण जर रोलर मशीन चा वापर केला तर आपल्या शरीरातील आणि चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. मसाज केल्याने चेहऱ्याला आराम मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment