सातारा प्रतिनिधी l पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ही मृत महिला ही मुंबईवरून आली होती. मुंबईवरून आल्यावर गावातील शाळेत या महिलेला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते.
मात्र वाटेतच तिचा मुत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नाही. ती व्यक्ती क्वारंटाईन असल्याने तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाने विभागात शिरकाव केला की काय या, भीतीने बनपुरी गावात एकच खळबळ उडाली आहे. ढेबेवाडी, तळमावले बाजापेठ बंद ठेवण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.