पवारानंतर संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी; गोळ्या घालून स्मशानात पोचवू

sanjay raut (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सुनील राऊत याना कॉल करून ही धमकी दिली आहे. संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला सांगा, अन्यथा दोन्ही भावांना गोळ्या घालून स्मशानात पाठवू अशी धमकी फोन कॉल द्वारे देण्यात आली आहे.

संजय राऊतांना समजवा, त्यांना सकाळची पत्रकार परिषद बंद करायला सांगा, नाहीतर गोळ्या घालून स्मशानात पाठवू अशी धमकी सदर व्यक्तींना सुनील राऊत याना दिली. त्यावर सुनील राऊत यांनीही बेधडक उत्तर दिले. संजय राऊत मर्द माणूस आहे, कुठे गोळी मारायची सांग, पाठवून देतो. कुठे गोळी मारायची तिथे मार असं प्रत्युत्तर सुनील राऊत यांनी दिले. नुकतंच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना धमकीचा कॉल आला होता, त्यानंतर आता राऊत बंधूनाही जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने धमक्या येत आहेत. सरकारला याची जाणीव आम्ही करून दिली आहे. पण सरकार काहीच करत नाही, त्यामुळे संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचं वाटतं असं म्हणत सुनील राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे या दोन्ही धमक्यानंतर राज्य सरकार आणि गृहमंत्रालय नेमकी काय पाऊले उचलणार हे आता पाहावं लागेल.