सावधान! SBI ने दिला इशारा, KYC च्या नावावर केली जात आहे फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. हे फसवणूक करणारे नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या स्वतःच्या फसवणूकीचा बळी बनवित आहेत. ही फसवणूक करणारी लोकं कॉल करतात आणि लोकांना त्यांचे केवायसी व्हेरिफाय करण्यास सांगतात. मग मदत करतो असे सांगतात. यानंतर, त्यांचे बँक खाते रिकामे करतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लोकांना सतत इशारा देत असते. याच अनुषन्गाने एसबीआयने बुधवारी आणखी एक ट्विट जारी केले असून आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1349311728236986371?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1349311728236986371%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fsbi-customers-alert-on-fraudulent-calls-or-messages-requesting-kyc-verification-nodvkj-3418178.html

KYC व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कॉल आणि मेसेजेस येत आहेत
एसबीआयने ट्विट केले आहे की, “केवायसी व्हेरिफिकेशनची रिक्वेस्ट करणार्‍या फेक कॉल्स किंवामेसेजपासून स्वतःला वाचवा.” फसवणूक करणारा आपला वैयक्तिक तपशील मिळविण्यासाठी बँक / कंपनी प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन कॉल करतो किंवा टेक्स्ट मेसेज पाठवितो. अशा घटनांची तक्रार cybercrime.gov.in वर द्या.

या व्यतिरिक्त, या ट्विटमध्ये एसबीआयने फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या आहेत –
1. कोणाबरोबरही ओटीपी शेअर करू नका.
2. रिमोट एक्सेस अ‍ॅप्स टाळा.
3. आधार कॉपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करू नका
4. आपली नवीन संपर्क माहिती आपल्या बँक खात्यात अपडेट ठेवा
5. वेळोवेळी आपला पासवर्ड बदला.
6. कोणाबरोबरही मोबाइल नंबर व गोपनीय डेटा शेअर करू नका
7. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी कृपया नीट तपासा.

बँक संबंधित अपडेटससाठी https://bank.sbi वर भेट द्या.
अलीकडेच एसबीआयने म्हटले आहे की गुगलवर शोध घेत बर्‍याच लोक चुकून बनावट साइटवर जातात. बँकेने ग्राहकांना सतर्क केले होते की, बँकेशी संबंधित अपडेटससाठी https://bank.sbi या वेबसाइटला भेट द्या. बर्‍याच वेळा ग्राहक Google वर सर्च करतात आणि कस्टमर केअर नंबर शोधण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात एसबीआयने सर्व ग्राहकांना सतर्क करणारे काही क्रमांकही जारी केले आहेत. एसबीआयच्या कस्टमर केअर नंबर 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधून कोणीही बँकेची माहिती मिळवू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment