अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. बूटा सिंह, सुखदेव सिंह, जजबीर सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर प्रत्येकी 50 हजारांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तर दीप सिद्धूसह जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते. आज सकाळी अखेर दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूला अटक केली. आता दिप सिद्धूचे फेसबुक अकाऊट अमेरिकेतील केलिफोर्निया येथील त्याची एक मैत्रिण चालवत असल्याचे समोर आले आहे. सदर तरुणी अभिनेत्री असून तिचाही या कृत्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. जॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करत आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

You might also like