….तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याने केला दावा

eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं सहजासहजी सोडून जात नाहीत. त्यामुळे काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे असेदेखील ते (deepak kesarkar) यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेदेखील कौतुक केले. अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतात मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजीतदादांसारखा असावा, असं वाटतं. जसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे. तसाच विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांचादेखील आम्हाला अभिमान आहे. अशा शब्दात दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!