आज महाराष्ट्राने घाबरलेला भोंगा पाहिला; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील नामांतराच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचे आवाहन मनसैनिकांना केले. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला. “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला,” असा टोला सय्यद यांनी लगावला.

दीपाली सय्यद यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राज ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. त्यांनी ट्विटरमध्ये म्हंटले आहे की, “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असा खोचक टोला सय्यद यांनी लगावला.

मनसेने मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेली भूमिका हि राज ठाकरे यांनी आजच्या सभेत मांडली. यावेळी त्यांनी पुन्हा आपले भोंग्याचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा एक प्रकारे इशाराच दिला. त्यासाठी आपण पत्र लिहून ते प्रत्येक मनसे सैनिकांमार्फत वाटणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हंटले. यावरून आज दीपाली सय्यद यांनी टोला लगावला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1193816048107580

 

भोंग्याबाबत राज ठाकरे काय म्हणाले ?

आज राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभा घेत भोंग्याच्या मुद्यांवरून पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. अजून आंदोलन करणे बाकी आहेत. आम्ही भोंग्याला विरोध केला म्हणून देशात इतिहासात पहिल्यादा काही ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले. या गोष्टीला सातत्य नसेल, तर पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. ते फक्त तुम्हाला तपासत असून तुम्ही हे विसरलात की हळूहळू आवाज वर यायला सुरू होणार. आता आंदोलन सुरु केले आहेच तर एकदाचा तुकडा पाडून टाका. मी एक पत्र तुम्हाला देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की घराघरात ते पत्र पोहोचले पाहिजे. हे आंदोलन आहे, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment