अयोध्येत आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, माफी मागावी लागणार नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचं राजकारण हे केवळ दोनच तालुक्यापुरते आहे. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे ते शिवसेनेला राजकारण काय शिकवणार?अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी जर भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत जावा. तुम्हाला माफी मागण्याची गरज लागणार नाही, असा टोला सय्यद यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना लखनौमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यांच्यानंतर आज शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या कि, उत्तर भारतीयांची त्या ठिकाणी जाऊन जर माफी मागणार असाल तर राज ठाकरे तुमचा बाणा कुठे गेला? जर अयोध्येत दंगल झाली आणि तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली तर तुम्ही काय करणार? असा सवालही सय्यद याणी विचारला आहे.

राज ठाकरेंमध्ये माफी मागू कि नाही याची चलबिचल सुरु – सय्यद

यावेळी दीपाली सय्यद राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी युपी मधील लोकांना तुम्हीच महाराष्ट्राबाहेर काढले होते. आता त्यामुळेच तुमच्या मनात सध्या चलबिचल सुरु आहे कि मी अयोध्याला जाऊन त्यांची माफी मागू कि नको मागू? यापेक्षा राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून त्यांच्यासोबत जावे म्हणजे माफी मागण्याची वेळ येणार नाही, असा टोला सय्यद यांनी लगावला आहे.

Leave a Comment