फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये…

0
664
Devendra Fadnavis Amrita Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच ट्विट करीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. शिवसेना काही ऐकत नाही, अशी टीका सय्यद यांनी केली आहे.

कल्याण येथे महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार संघटनेच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात आपण हिंदू, मुस्लिम, शीख यांसारख्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात एकत्र नांदतात. सगळे सण आपण एकत्रितपणे साजरे करतो. राज यांनी जी काही वक्तव्य केली आहेत. त्यानंतर भोंग्यावरुन जी कहाणी सुरु झाली आहे.

यावेळी सय्यद यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होत असलेल्या सभेवरून त्यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांची आज सभा होत आहे. त्यांची सभा सक्सेस व्हावी यासाठी कोणीतरी विजयी भव असे सांगितले आहे. त्यांना आजपर्यंत कोठेच विजय मिळाला नाही. येथे तरी त्यांना विजय मिळू दे. जे राजकीय, धार्मिक वाद होत आहेत याचा परिणाम हा तळागाळातील सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. त्यामुळे आता लोकांनी विचार करायला पाहिजे की कोणाच्या सभांना किती गर्दी करायची, कोणाच्या सभा सक्सेस करायच्या, असेही सय्यद यांनी यावेळी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here