किरीट सोमय्यांच्या ऐवजी गाडीत मोदी असते तरीही ती फोडली असती

Deepali Syyed Modi Kirit Somaiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शनिवारी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. “हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. जो नडला त्याला फोडला हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. त्या ठिकाणी जर नरेंद्र मोदीजींची देखील गाडी असली असती तर तीही फोडली गेली असती”, असे सय्यद यांनी म्हंटले आहे.

दीपाली सय्यद यांनी आज रायगड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या संकल्प सभा सुरु आहेत, या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांना उत्तर दिली आहेत. हे चुकीचे सुरु असल्याचे या नेत्यांनी म्हंटले आहे. दोन-तीन दिवसांपासून जे सुरु आहे. राणा कुटुंबीय आहेत हे मोदीजींचे माकडे आहेत असे मी आधीच सांगितले आहे.

हे लोक अचानक येतात आणि अचानक बोलतात. त्यांची विधानेही चुकीची आहेत की आम्ही मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा म्हणणार, हे चुकीचे होते. तुम्हाला करायला मनाई नव्हती. तुम्ही प्रेमाने या तुम्ही मंदिरांमध्ये येऊन हे करा. हा विचित्र खेळ सुरु असल्याचे दिसत असल्याचे सय्यद यांनी यावेळी सांगितले.