हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, जन आशीर्वाद यात्रेवरून केंद्र सरकार व राणेंवर टीका केली. “राज्यात कोरोना अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघत आहे. या यात्रेचा नक्कीच परिणाम हा होणार आहे. त्याचा फटका बसणार असून कोरोनात वाढ होईल यात शंका नाही,” अशी टीका पवारांनी केंद्र सरकारवर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राणेंचा गोष्टीवर जास्त चर्चा करायची नाही. राणेंचे राणेंना लखलाभ. आम्हाला आमचे राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालवायचे आहे. ते केंद्रातील मंत्री आहेत. त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित चालवावं.
कोरोनात राजकीय जोडे बाजूला ठेवून वागावे
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांसह सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना आवाहन केले. देशातील जेव्हा जनतेचा आरोग्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा कोणत्याही स्वरूपाचे राजकारण कुणी करु नये. सर्वांनी अशा परिस्थितीत कोणत्या प्रकारचे राजकारण करू नये. त्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेऊन वागावे, असे पवारांनी म्हंटले.