हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनच्या व्हेरियंटबाबत सध्या भीतीचे वातावरण लोकांमध्ये पसरले आहे. अजूनही या विषाणूचा प्रसार वाढेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारकडूनही याबाबत घाबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत महत्वाचे विधान केले आहे. “महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांबाबत काही नियम पाळावे लागणार असून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक असणार असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागीलवेळी कोरोनाच्या काळात आपल्या नियमावलीत तफावत होती. मात्र, नियम एकसारखे हवेत त्यामुले भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले तर त्यांच्यासाठी नियम सर्वांसाठी सारखे असावेत यासाठी बदल करण्यात आलेले आहेत. इतर राज्यातून येताना दुसऱ्या राज्यात जाताना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो त्याप्रमाणे आता आपल्याकडे येताना प्रवाशांना रिपोर्ट दाखवावा लागाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेने गरजेचे आहे.
यावेळी पवारांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत विधान केले आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे दोघे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि मुंबईच्या महापौरांनी राज्यात तर देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुले नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेतले जातील, असेही पवार यांनी म्हंटले आहे.