हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीयाईकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, असे धोकादायक विधान केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिले आहेत. ‘परमवीर सिंह यांच्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपांबद्दल सुनावणी देताना न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. गृहमंत्री अनिल देशमुख, परिवाहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, असे पुढील लाभार्थ्यांचीही नावे येतील. तसेच शरद पवार त्यांच्या लाभार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील.’, असे भाकीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी केले.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर आता राजकारण तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी 15 दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला आहे. त्यानंतर देशमुखांनी राजीनामा देत थेट दिल्ली गाठली असल्याने आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.