मुंबई | देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ज्या प्रकारे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे तसेच राज्य सरकारनेदेखील पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
⚫️कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे.
⚫️याविरोधात भाजपातर्फे आज राज्यभर स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले जात आहे.#महाराष्ट्र_बचाओ #MaharashtraBachao pic.twitter.com/QJIwdTBaXd— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2020
कोरोना संकटाचा सामना ज्या पद्धतीने राज्य सरकारने करायला हवाय त्या पद्धतीने सध्याचे सरकार करताना दिसत नाहीये. त्यामुळे देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तसेच कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांत कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना उपचार देखील मिळत नाहीयेत अशी परिक्षिती आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढतायत तर दुसरीकडे शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे. अजूनही शेतकऱ्यांचा शेत माल घरी पडलेला आहे. राज्य सरकारने अजूनही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केलेला नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
बारा बलुतेदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. देशात केंद्र सरकारने मोठे पंकज जाहीर केले आहे. तसेच विविध राज्यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केलेले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप असे कोणतेही पॅकेज जाहीर केलेलं नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे कि महाराष्ट्र सरकारने देखील पॅकेज दिले पाहिजे. विशेषतः बाराबलुतेदारांना पॅकेज दिले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे फडणवीस यांनी सांगितले.