शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युती झाली तरी राज्यातील काही ठिकाणांवर शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे केले आहेत. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांच्या कणकवली येथील मतदारसंघातही सेनेने आपला उमेदवार देऊन राणेंना आणि भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडींचा खरपूस समाचार मुख्यमंत्र्यांनी आज कणकवली येथील सभेत घेतला. आक्रमक असलेल्या नितेश राणेंना पुन्हा एकदा निवडून द्या. त्यांच्या आक्रमकतेला आम्ही संयमाची जोड देणार असून त्यांना राज्याच्या राजकारणात नारायण राणेंसारखं वलय मिळवून देण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

या सभेत त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. नरेंद्र मोदींच्या वैश्विक नेतृत्वाचा त्यांनी पुन्हा एकदा दाखल दिला. यासोबतच येत्या निवडणुकीत एकूण मतांच्या ६० ते ६५ % मते नितेश राणेंना मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये दुष्काळमुक्त, रोजगाराभिमुख, कृषीसंपन्न आणि प्रगतशील महाराष्ट्राची संकल्पना मांडण्यात आली असून, कणकवलीमधील भाषणातही मुख्यमंत्र्यांनी याचा पुनरुच्चार केला.

1 thought on “शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली”

  1. याला इतका सत्तेचा माज आला आहे कि काय सांगणारं, अरे हिम्मत असेल तर पेपर वर मतंदान घे, मग तुला समजेल, बिजेपी चे प्रवकते आहे त्यांचे बोलणे ऐकून तळ पायाची आग मस्तकात जाते असे त्यांचे बोलणे असते ,अजून मतदान झाल नाही आणि मुख्यमंत्री बनायची घाई झाली आहे, मला तर असे वाटते की आधी पासूनच EVM सेटिंग करून ठेवली की काय?

    Reply

Leave a Comment