…म्हणून अजित पवारांसोबत शपथविधी घेतला; फडणवीसांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार बनवणार तोच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेच शपथविधी घेत राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली होती. पण आता एका मुलाखतीत बोलताना मात्र फडणवीस यांनी हे व्हायला नको पाहिजे होत अस म्हणत त्या शपथविधी मागील खर कारण देखील सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आले होते. पण आता आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे.

हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं” असं सांगितलं. फडणवीसांनी आपण एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

You might also like