नुकसानीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या; फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा नुकताच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौरा केला. यात 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये “नुकसानग्रस्त भागास तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही स्वरूपात मदत देण्यासाठी बैठक घ्यावी तसेच लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटल आहे की, “कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर यांच्यासमवेत दौरा करून, पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्या. त्यानंतर आता तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनाबाबत मागणी करीत आहोत.

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 25 जुलै रोजी कोकण आणि 28 ते 30 जुलै या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागात दौरा केला आहे. यावेळी पूरग्रस्तांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या झालेल्या नुकसानीचीही माहिती घेतली आहे. ती घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र पटवून महत्वाच्या मागण्याही केलेल्या आहेत.

Leave a Comment