हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवड केली जाईल असे वाट होते. मात्र, या अधिवेशनात मात्र, निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. या सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बदल केला जात असल्याचे फडणवीसांनी म्हंटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारकडून चालढकल सुरु आहे. याबाबत भाजपकडून आघाडी सरकारवर अनेकवेळा टीका करण्यात आली आहे. निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला फटका बसू नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले कि, आम्ही अनेक दिवसांपासून विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी करीत आहोत. मात्र, या सरकारकडून अध्यक्षांची काही केल्या निवड केली जात नाही.
विधानसभेचे कुठलेही नियम बदलायचे असतील तर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली पाहिजे. उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक व्हॅलिड होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. या आघाडी सरकारमधील वरिष्ठांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे हात वर करून निवडणूक घेण्याचा विषय आलेला असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले आहे.